अध्यात्म का व्यवसाय
इतक्यातच एक बातमी वाचली , भारत सरकारने ह्या वर्षीचे 'पद्म' पुरस्कार जाहीर केले , त्यात जशी नेहमी काही नावे खटकतात तसे ह्या वेळीही एक नाव खटकले . कोणी एका श्री श्री नावाच्या माणसाचे ज्याला अध्यात्मिक गुरु म्हणून सन्मानित करण्यात आले होते.
नेहमी सारखे बरेच सारे प्रश्न आणि शंका मनात येउन गेल्या,ह्या सगळ्यावर हसायचे का रागवायचे ते कळत नव्हते.
आपल्या कडे संतांची किंवा गुरु शिष्य संस्कृतीची खूप मोठी परंपरा आहे. पण हे जे काही सध्या चालले आहे ते मात्र ढोंगी पणा आणि व्यवसाय ह्या पलीकडे नक्कीच दुसरे काही नाही.
मी जे लहान पणा पासून वाचत किंवा ऐकत आलो , ते संत तुकाराम , द्यानेश्वर , गजानन महाराज आणि बरेच खरे संत ह्यांनी समाजप्रबोधनासाठी कधी पैसे घेतले नाही मोठे मोठे आश्रम बांधले नाहीत. तुकारामांनी ओव्या रचल्या त्यासाठी मानधन नाही घेतले किंवा ते लोकांपर्यंत पोहाचावाण्या साठी अजून वेगळे काही पर्यंत केले नाही. मोठे क्लासेस नाही काढले. लोकांना आर्ट ऑफ लिविंग हे सोप्या शब्दात आणि विनामूल्य शिकवले.
कोणा एका उचाभ्रू समाजाचा भाग न राहता तळागाळा पर्यंत पोहचवण्याचा ह्या सर्वांनी पर्यंत केला. ह्याला आजवर आम्ही संत म्हणालो स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार करणे , मोठ्या महालात राहून कोट्यावधी रुपये कमावून समाज सुधारणा होते ? आश्यर्य आहे म्हणा.
बाबा आमटे सारख्या लोकांना करावी लागली का हो कसली जाहिरात कि आजपासून आम्ही हे असे काम करणार आहोत सगळे या पैसे द्या मग आम्ही करु . त्यांनी कित्येक वर्षे स्वतःच्या जीवावर गरजू लोकांसाठी स्वतःला अक्षरश अर्पण केले , विदेश वार्या करून समाज नाही सुधारला.
माझा त्यांच्या व्यवसायावर आक्षेप नाही कारण प्रत्येक जण पैसा कमावतो, फक्त आक्षेप हा आहे कि तुम्ही सर्वाना सांगा कि आम्ही हे भावनेचे भांडवल आमच्या स्वार्था साठी करत आहोत ह्यात धर्म अध्यात्म असे काही नाही , आम्हाला काही नको आणि आम्ही समाजासाठी काही करतो हि भावनाच चुकीची आहे , कारण असे होताना दिसत नाही . सगळा केवळ व्यवसाय .
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना असंख्य अडचणी दुखः असतात , आणि म्हणून ते कोणाचा किंवा कुठलातरी आधार घेतात, त्यांच्या अश्या असह्यातेचा फायदा घेऊन स्वतःची पोट भाराने हे कसले गुरु , हे तर पक्के व्यावसायिक आजकाल कोणी हि उठते सद्गुरु होते गुरु होते , अश्या बाबा बुवा मुळेच समाज प्रगती करू शकत नाही , त्यांचे ह्या समाजाला अजून स्वतःवर अवलंबित करायचे आणि त्यांचे विचार छाटून टाकायचे आणि स्वतःचे ध्येय पूर्ण करायचे हेच उदिष्ट आहे
आणि अश्या माणसांचा आपण सत्कार करणार आहोत ? किती दिवस आपण अजून ह्या समाजाला असेच खाली खेचणार आहोत
माणूस आणि माणुसकी हाच एक धर्म आणि हीच एक जात आणि त्याचा सन्मान,प्रगती साठी माणुसकी साठी जगा , ह्या अश्या बिन भांडवलाच्या धंद्याला कितपत पाणी घालायचे हे आपल्या हातात आहे. आपले विचार आपली सदसद्विवेकबुद्धी वापरा. आपले हजारो वर्षापासुनचे अफाट साहित्य आहे त्याचे अध्ययन करा अश्या ढोंगी बाबांची गरज भासणार नाही.
स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या मातापित्यांचा आशीर्वाद घ्या , नक्कीच सगळे मार्ग सापडतील. कोणालाही स्वतःच्या अडचणीचे भांडवल करून त्यावर पैसे कमवू देऊ नका कष्टाचा पैसा असा व्यर्थ घालवू नका. कोणी म्हणते म्हणून काही करू नका त्याचा स्वतः उठून विचार करा अंध अनुकरण करू नका , नुकसान फक्त आपलेच आहे.
समाजाच्या प्रगती साठी एकत्र येवूयात . आपापसातले मतभेद जात धर्म ह्या पलीकडे जाऊन सक्षम समाज बनवूया , मित्रांनो प्रगतीला गुरु बनवूया सरावाचा विकास करून एकत्र पुढे जाऊयात .
शुभं भवतु
अद्वैत