साथ
आज असेच श्री प्रकाशराव बाबा आमटे विषयी वाचत होतो , सर्वांच्या हृदयावर आदर्श छाप पाडणारे अवलिया व्यक्तिमत्व.
असेच माझ्या विनोद बुद्धीला काही प्रश्न पडले , कि मंदाताई नी समजा प्रकाशरावंना असे सर्वसाधारण प्रश्न विचारले असते , तुम्हाला काय करायचे आहे ?
कशाला लष्कराच्या भाकऱ्या थापता ? त्या लोकांना कळणार तरी आहे का तुम्ही काय म्हणता त्यांची तेव्हडी समज तरी आहे का ? त्यांना तुमची गरज हि नाही ? तुम्हाला ते तुमच्या मागे नावं ठेवतील ? कशाला उगाच तुमची वर्षे फुकट घालवता ? चांगली प्रक्टिस करा घरा कडे लक्ष द्या , सुखाने बायका मुलां कडे लक्ष द्या ? समाजाला सुधारण्याचा ठेका काय फक्त तुम्हीच घेतला आहात का ? असे कित्येक , म्हणा विनोदाचा भाग निराळा.
पण खरेच मंदाताई च्या खंबीर आणि साकारात्काम साथी शिवाय प्रकाशराव इतका मोठा शिवधनुष्य पेलू शकले नसते कदाचित. त्यांना प्रत्येक अडचणी मध्ये मागे खेचण्या पेक्षा पुढे जाण्यासाठी बळ दिले साथ दिली आणि काठावर उभे राहून चुका काढून खच्चिकरण करण्यापेक्षा त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन त्या युधाभूमिमध्ये धैर्याने उभ्या राहिल्या , खरच अश्या माउलीला शतशः प्रणाम , हेच खरे स्त्री सशक्तीकरण आहे , आता प्रत्येकाला प्रकाशराव होता येते असे नाही आणि त्यांना तशी मंदाताई सारखी साथ मिळेल असे हि नाही , ज्याचा त्याच्या नशिबाचा भाग.
हा विषय आज बोलण्याचं प्रयोजन इतकेच , त्या दोघांनी एकमेकांच्या साथी ने एका वेगळ्या समाजाचा पायैन्डा घातला , आपण हि असेच एकमेकांना साथ देऊन नवीन काही नक्कीच करू शकु. आज आपल्या समाजात जी काही अराजकता माजली आहे , राजकारणी , बुद्धीजीवी आपापल्या पद्धतीने सामाजिक परिस्तिथी चे वाभाडे काढत आहेत. झेंड्याचे , जातीचे भेद आणून समाजाला तोडण्याचा प्रयन्त चालू आहे.
आज सगळे जण प्रदेश वेगळा हवा , आरक्षण हवे ह्यासाठी भांडत आहेत , प्रगती साठी किंवा एकी साठी कोणीच पुढे येत नाही आहेत …
लिंग,जात,धर्म,हिरवा/भगवा/निळा,श्रीमंत गरीब असा भेद न करता मानवता हा एकाच धर्म आणि तीच एक जात असे बाळगून , जुने हेवेदावे विसरून एक समानतेचा समाज घडवूयात , ज्यात कशाला हि आरक्षण नाही , प्रत्येकाला समान न्याय आणि अधिकार , फक्त कर्तुत्वाला आणि माणुसकीला किमंत हवी.
टिळकांनी , फुलेंनी , बाबासाहेबांनी , जे वैचारीक आणि समानतेच्या समाजाचे स्वप्न पहिले आहे ते तुम्ही आम्ही एकत्र येउन पूर्ण करू शकू.
प्रत्येकाचे ध्येय फक्त प्रगती , माणुसकी हेच असायला हवे, कोणत्याही बाबा बुवा च्या नादाला लागण्यापेक्षा , माणसात देव पाहूयात. प्रत्येकाला साथ देऊ कसलाही भेदभाव न ठेवता एकत्र येउन काम करू , समाजाला एक सक्षम आणि सुसंस्कृत अशी बाजू देऊ, मला मान्य आहे गेले कैक वर्षे ह्या सगळ्या ढिगार्याखाली आपला समाज दबला आहे , त्याला बाहेर काढणे कठीण आहे पण अशक्य नाही, आपण सगळे जण एकत्र आलो ,आपल्यातली सगळी दरी मिटवली आणि फक्त माणूस म्हणून एकमेकांना साथ दिली ,हाथ दिला तर खरेच शिवरायांचे खऱ्या सुराज्याचे स्वप्न लवकरच साकारेल.
प्रत्येकाला फक्त स्वतःपासून सुरवात करायची आहे , आपल्या जवळ जे काही आहे जसे आहे त्यातून एका एकसंध उदिष्ठा साठी जे काही करता येईल ते करूयात , पर्यावरण वाचवणे असेल , नियम पाळणे असेल , परिसर स्वच्छ ठेवणे असेल, गरजवंताला मदत करणे असेल,जात पात न पाळता सर्वाना एक न्याय देत सालोख्याने राहणे असेल , समाजातील दिन दुबळ्या लोकांना त्यांच्या पायावर उभे करणे असेल, समाज शिक्षित आणि सुसंस्कृत करणे असेल , किंवा अजून बरेच काही प्रत्येकाच्या शक्ती नुसार इच्छे नुसार गरजे नुसार आपापल्या पद्धतीने ह्या समाजचे देणे फेडूयात.
माझ्या ह्या छोट्याश्या प्रयत्नाला आपली साथ मिळेल अशी आशा आहे , ह्या संकेत स्थळावर आपण आपल्या कल्पना , अडचणी , उपदेश , मार्गदर्शन , असे सगळे काही नोंदवू शकता , एकमेकांना मदत करू आणि ह्या समाजाचे चित्र बदलण्याचा एक पर्यंत करू,
शुभं भवतु
अद्वैत