Friday, March 18, 2016

सुसंस्कृत का प्रगत

आपण सगळे नेहमी म्हणतो भारत हे एक प्रगतीशील किंवा विकसनशील राष्ट्र आहे बाकी काही इतर देशांसारखे प्रगत राष्ट्र नाही.
ह्यावरूनच एक विचार मनात आला ,प्रगत म्हणजे नेमके काय आणि कशाला प्रगत म्हणायचे ?
ज्या राष्ट्रा मध्ये खूप पैसा आहे आजूबाजूला लक्ख रोषणाई आहे अश्या राष्ट्राला प्रगत म्हणायचे का जिथे संस्कार, संस्कृती आणि प्रगल्भ विचार आहेत अश्या राष्ट्राला प्रगत म्हणायचे ?
आम्ही विचारांनी प्रगत आहोत का ? प्रगतीच्या नावाखाली आम्ही चंगळवाद कडे चाललो आहोत का ? हे प्रश्न सर्वसामान्यांना पडतच नाहीत का ?
ज्याला आपण प्रगती म्हणतो आहोत ती खरीतर अधोगती आहे असे आम्हाला जाणवतच नाही.
ज्या मुलभुत तत्वांवर आपली प्रगती उभी राहायला हवी ती तत्वे च कुठेतरी लोप पावत चालली आहेत मानसिकता आणि विचाराधीनता च कुठेतरी रसातळाला जात आहे.
मद्यपान न करणे ,अंगप्रदर्शन न करणे,खोटे वा अप्रामाणिक न वागणे,थोरामोठ्यांचा आदर  करणे,नात्यांमध्ये मानसिक आधार असावा  असे किती आणि कोणती तत्व आम्ही दुर्लक्षित करतो आहोत , काही बुद्धीजीवी ह्यावर ही चर्चासत्र आयोजित करून वादविवाद करतात खरेच ह्यात हि वाद होऊ शकतो ज्या गोष्टी तुमच्या अंगभूत हव्यात जीवनाचा एक भाग हव्यात त्यात हि कशी अडचण वाटू शकते.
जसे दोन वेळेला जेवण लागते आणि त्यासाठी कसलाही वाद नसतो आपण कोणाला विचारात नाही का रे बाबा हे बरोबर का चूक तसेच हि तत्वे आहेत त्यात का विचारावे लागते का प्रश्न पडतो.
हे गुण एखाद्या व्यक्तीच्या अंगी असतील तर त्याचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि आपोआपच समाज सुसंक्तृत होईल
आजकाल एक स्वातंत्र्य नावाचा नवीन विषय उदयास आला आहे ,आपण भारतमाते साठी मिळवले ते स्वातंत्र्य नव्हे तर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आणि गम्मत म्हणजे त्याची व्याख्या हि त्याच व्यक्ती ने ठरवलेली असते ज्या करवी सगळे काही खपून जाते मग त्या मद्यधुंद पार्ट्या असो किंवा अर्धनग्न अवस्थेमध्ये विचित्र अंगविक्षेप करत नाचणे असो.
ह्या अश्या गोष्टींवर वेसण घालणार तरी कोण आणि कसे ? ज्या लोकांना आपण स्वतःच  संपत चाललो आहोत हे कळत नाही त्यांना समाज संपतो आहे हे कधी जाणवणार.
ह्या चुकीच्या प्रगतीच्या नादात आपण माणूसपण सोडत आहोत का ? स्वातंत्र्य वाईट प्रवृत्ती पासून, विकृत विचारांपासून, जुन्या चुकीच्या रूढी परंपरांपासून, हवे असे का नाही ठरवत आणि योग्य मार्ग अवलंबत.
ज्या लोकांना ह्या अश्या वागण्याचा तिरस्कार येत नाही पण प्रश्न मात्र पडतात आम्ही आमच्या पद्धतीने का नाही जगायचे आणि त्यात वाईट ते काय त्यांना असे प्रश्न नाही पडत का, कि खरच मी योग्य मार्गाने आणि प्रवृतीने वागलो तर त्यात वाईट ते काय ?
अंगभर कपडे घालणे व्यसनाधीन न होणे सर्वाना सांभाळून समाजाचा तोल सावरणे माणसामध्ये देव बघणे ह्यात वाईट काय आहे ,हरकत काय आहे करायला?
सात्विक न राहण्या मागे कारण काय ह्याचे उत्तर सहसा नसते ह्या बुद्धीजीवी कडे नुकसान नक्कीच नाही ना काही असे वागलो तर.
आपण स्वतःला पुरोगामी विचारांचे पुढारलेले म्हणवतो पण ह्याच अश्या समाजामध्ये आजही आंतरजातीय विवाह वेगळ्या निकषांमध्ये मोजला जातो,विधवा विवाह आजही १००% स्वीकारला जात नाही,बलात्कार झाल्यावर त्या बिचार्या अबला स्त्री ला समाजात मानाचे  स्थान मिळत नाही लोकांच्या नजरा बदलतात,कोड असलेला स्त्री पुरुष आजही त्याचे नसलेले आजारपण लपवत समाजात वावरतो,मतीमंद किंवा अश्याच मानसिक रुग्णांना आमच्या कडे दया मिळते पण बरोबरीचे स्थान मिळत नाही,विकृत  प्रवृत्तीच्या नराधमाना आमच्याकडे शिक्षा नाही , असे बरेच काही ..
का नाही आम्ही ह्यातून स्वातंत्र्य मागून विचारा मध्ये मानसिकते मध्ये प्रगत होऊन समाजाची प्रगती करत.
नग्नता किंवा व्यभिचार हि प्रगती नव्हे , प्रचंड पैसा  अडका कमावला पण जन्मदात्या आई वडिलांना विसरला लहान लोकांशी कसे वागावे ह्याची चाड लक्षात नाही राहिली तर हि प्रगती काय कामाची.
माणसांबद्दल माणुसकी नसेल करुणा ,प्रेम नसेल तर त्या व्यक्तीच्या प्रगतीला कसलाही अर्थ उरत नाही.
सांगायला बोलायला बरेच आहे पण इतकेच सांगेन कि विचाराने प्रगत व्हा कोणत्याही चुकीच्या गोष्टींचे अंध अनुकरण करून आपल्या संपन्न संस्कृतीकडे पाठ फिरवू नका.
लिंग ,जात,धर्म ह्यात कसलाही भेद न करता झेंड्याचे राजकारण न करता ,ह्या पलीकडे जाऊन फक्त माणुसकीचा विचार करून एक सक्षम आणि सुसंकृत समाज बनवूया.
माणसातली माणुसकी ओळखून त्यातच देव मानला ,दुसर्याचे मन समजुन अडचणी मध्ये आधाराचा हात दिला ,तर सहज सोपे आनंदी आयुष्य जगणे फार काही अवघड नाही.
चला तर मग एक सुसंस्कृत आणि प्रगत समाज बनवूयात आणि त्याची सुरवात स्वतः पासून करूयात.

शुभम भवतु

अद्वैत 

No comments:

Post a Comment