समाज - समंजस का असमंजस
इतक्यातच काही बातम्या वाचनात आणि ऐकण्यात आल्या , जन्माष्टमीच्या दिवशी ९ थरांची दहीहंडी , गणेशोस्तवात वाढणारा विभत्सपणा , रिक्षेवाल्यांचा संप आणि बरेच काही. नेहमी प्रमाणे बऱ्याच गोष्टिचा विचार लावून गेल्या ह्या बातम्या.
समाजात होणाऱ्या ह्या अश्या गोष्टी म्हणजे निर्दिस्त समाजाला लागलेली कीड , हि काढणे जास्त महत्वाचे का मोदी जो विकासाचा शिवधनुष्य पेलवण्याचा प्रयन्त करतात तो महत्वाचा. ह्यावर आपण कायम चर्चा करतो टीका करतो , पण कदाचित ह्या मागचे नेमके कारण जाणून घेऊन त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही.
ह्या सगळ्या बातम्या वाचल्या कि कुठेतरी असे जाणवते कि हे बाकी काही नसून कायम चालत आलेले अतिशय घाण राजकारण आहे ज्यात समाजकारणाला काही हि स्थान नाही , आणि त्यामुळे कदाचित विकासाचा शिवधनुष्य पेलणे अवघड होऊन बसले आहे.
आपण जन्माष्टमीच्या आणि गणेशोत्सवाचे हि राजकारण केले, ९ थर लावावे का ? हा प्रश्न हिंदू अस्मितेचा ठरवून त्याला जातीय रंग आणून त्यावरून राजकारण. किती थर लावतो ह्यापेक्षा नेमका जन्माष्टमी का साजरी करतो आणि ती गीता आपण जगतो का आणि तसे वागतो का ह्याच विचार का नाही होत?. हिंदू असण्याचा अभिमान बाळगायचा तर त्या आधी खरे हिंदू तर होऊ आपण. का कायमच कोणीतरी आपल्याला राजकारण आणि पैसे ह्या मध्ये मोजून भावनांशी खेळ करणार. थर लावा योग्य ती काळजी घ्या पण नेमके ह्या मागचे राजकारण समजून घ्या. ह्या दिवसात होणारा देवाच्या नावाखाली चालणार काळा बाजार , प्रचंड पैश्याची उलाढाल करता यावी म्हणून सुरु केलेलं हे भीषण रूप आणि ह्याला दिलेला जातीचा आणि धर्माचा रंग हे न कळण्याइतपत आपण आंधळे झालो आहोत का ? राजकारणी त्यांचे मतांचे राजकारण करतात आणि आपण केवळ बघत राहतो.
लोकमान्यांनी सुरु केलेला खरा गणेशोत्सव आता खरेच राहिला आहे का? त्याचा जो प्रामाणिक हेतू होता तो खरेच आता काळाआड गेला आहे. ह्या सर्व सणांना एक व्यावसायिक आणि राजकारणी रंग आला आहे..
आणि हा केवळ आपल्या मुळे आला आहे. ह्यात त्या राजकारण्यांचा काही दोष नाही कारण ते त्यांचे खुर्चीचे राजकारण करत राहणार , त्यात आपण कितपत अडकायचे आणि त्याचा बळी व्हायचे हे आपल्या हातात आहे
आम्ही नेहमी म्हणतो कि अश्लील नाच , कर्णकर्कश्य गाणी हे आमच्या आराध्य बाप्पा समोर का लागतात नको लागायला , पण ह्या अश्याच मिरवणुकीला आम्ही गर्दी करतो, आमच्या घरातली तरुण मंडळी ह्या गाण्यांवर नाचतात.राजकारणी ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा स्वार्था साठी उपयोग करून घेणारच.
अशी अर्वाच्च गाणी आम्ही ऐकतो म्हणून ती प्रसिद्ध होतात आम्ही ऐकलेच नाही तर कोण कशाला तयार करेल अश्या प्रकारचे थोतांड.
आम्हला लोक हिंदू मुस्लिम वरून लढवतात आणि आम्ही लढतो . ज्या संस्कृतीसाठी आमचा जीव तुटतो ती अजून रसातळाला नेण्या साठी आम्हीच पुढाकार घेतो, ती टिकवण्यासाठी आम्ही असे किती आणि काय प्रयन्त करतो , आम्ही केवळ टीका करतो. आणि नंतर त्यालाच अप्रत्येक्ष पणे साथ देतो.
लाखो रुपयांचा धंदा मंडळे करतात असे आम्ही म्हणतो पण हा पैसे त्यांचा कडे येतो कुठून आपल्या कडूनच ना , मग समजा आम्ही आमचा पैसे एखाद्या गरजूला दिला आणि मंडळांना त्यांचा धंद्यात मदत नाही केली तरी बाप्पा पावलाच कि
आम्ही दहीहंडी साठी कोट्यावधी रुपये खर्च करतो पण ज्या कृष्णाने कर्मावर भर देऊन माणसात देव पहा म्हणले ते आम्ही ऎकत नाही
सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे संतू निरामयाः
असे आमच्या धर्मात सांगितले त्याचे खरेच पालन आम्ही करतो का ? खरेच आम्ही धर्म जाणून त्याचे रक्षण आणि प्रचार करतो का? मग हे थर लावून आणि अश्लील नाचगाणे करून आम्ही नेमका कोणता धर्म जपतो आहोत किंवा नेमक्या कोणत्या धर्माचा प्रचार करतो आहोत
ह्यातच एक बातमी आली ती म्हणजे रिक्षेवाले संपावर गेले का तर म्हणे काही व्यावसायिक टॅक्सी कंपन्या बाजारात आल्या आणि ह्यांचा धंदा बसला म्हणे , हे वाचायला जितके बालिश वाटते तितकेच ते आहे देखील
तुम्ही तुमचे कर्म ( हिंदू धर्मात सांगितल्या प्रमाणे ) चोख आणि प्रामाणिक पार पाडले तर तुमचे काम कोणी कसे हिरावून घेऊ शकेल. आपण आपले काम योग्य रित्या करत नाही म्हणून त्याचा फायदा दुसर्यांना मिळतो .
मागे हि असेच एक राजकारणी मराठीचा मुद्दा पुढे करून मतांची भीक मागत होते , अहो मला सांगा मराठी माणूस खरेच इतका कमकुवत कमजोर आहे का ? इतका कर्तृत्वान समाज खरेच त्याला अश्या गोष्टींची गरज आहे का ?
मराठी माणसाला कोणी प्रगती वाचून अडवले आहे का ? गुजराती, मारवाडी, सिंधी, बिहारी हे सर्व लोक जीवापाड कष्ट करतात आणि मग इथवर पोहचतात तुम्ही हि करा कोणी अडवले आहे ?
ह्यात केवळ गरीब लोकांचा बळी दिला जातो घाण राजकारण करून बलाढ्य लोक अजून गब्बर होतात आणि समाजाचा आर्थिक आणि मानसिक दर्जा दुभंगला कि त्यावर स्वतःची भाकरी भाजतात.
लिहायला खूप आहे डोक्यात मनात , पण मित्रांनो इतकेच सांगेन , आपण सगळे मिळून नवीन समाज घडवू शकतो , आपल्याला केवळ ती जागरूकता आणायची आहे.
आपण ठरवूया आपल्या पासून सुरवात करूयात , "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले" .. ह्या मार्गावर जायचे, बाबा बुवा धर्म ह्यात अडकून न बसता माणसात देव पाहायचा, जन जागृती करायची , मदत करायची, कष्ट करायचे ,स्वतः प्रामाणिक राहून लोकांना तसे करायला प्रवृत्त करायचे .
पैसे देव्हाऱ्यात टाकण्याऐवजी एखाद्या गरीबाच्या घरात एक वेळचे जेवण मिळेल ह्याची सोय करूयात , देव माणसात बघू तिथेच तो भेटेल आपल्याला.
खऱ्या अर्थाने हिंदू धर्म साकार करू प्रस्तापित करू. गीतेत सांगितल्या प्रमाणे , "कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" ह्या मार्गावर चालून समाजाचा स्वतःचा आणि मानवजातीचा उद्धार करू .
असा सक्षम समाज समाज उभा राहिला तर प्रगती आणि विकास असा कितीसा दूर आहे.
शुभम भवतु
अद्वैत

No comments:
Post a Comment